Asia Cup 2025: भारतीय संघाची घोषणा कधी होणार? मोठी अपडेट आली समोर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप 2025 मध्ये भाग घेणार आहे. सूर्यानं या स्पर्धेसाठी फिटनेस टेस्टही उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे तो भारताचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळणार आहे. मात्र अजूनपर्यंत बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. संघाची घोषणा कधी होणार? यावर मोठी अपडेट समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. कारण आता स्पर्धा सुरू होण्यासाठी सुमारे 20 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. सांगायचं म्हणजे भारतापूर्वी पाकिस्तानने आशिया कप 2025 साठी आपला संघ जाहीर केला आहे. बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Comments are closed.