फ्री.. फ्री.. फ्री….. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आशिया कप 2025च्या सर्व सामन्यांची तिकीटं मोफत
29 ऑगस्टपासून बिहारमधील राजगीर येथे पुरुष हॉकी आशिया कप 2025 सुरू होत आहे, सर्व संघ बिहारमध्ये पोहोचले आहेत. भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना 29 ऑगस्ट रोजी चीनशी आहे. यापूर्वी, हॉकी इंडियाने एक मोठी घोषणा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आशिया कप सामन्यांसाठी तिकिटे मोफत असतील. सर्व सामन्यांसाठी प्रवेश मोफत असेल, चाहते स्टेडियममध्ये जाऊन कोणताही सामना मोफत अनुभवू शकतील.
या संर्दभात घोषणा करताना हॉकी इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “हिरो मेन्स आशिया कप राजगीर, बिहार 2025च्या सर्व सामन्यांसाठी प्रवेश मोफत असेल. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 पर्यंत नव्याने बांधलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळवण्यात येणारी ही स्पर्धा बिहारच्या (राजगीर) मध्यभागी हॉकीचा एक भव्य उत्सव असल्याचे आश्वासन देते.”
चाहते wwe.ticketgenie.in किंवा हॉकी इंडियाच्या APPला भेट देऊन मोफत तिकिटे बुक करू शकतात. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, येथे एक व्हर्च्युअल तिकीट उपलब्ध होईल. तिकिटे बुक करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. व्हर्च्युअल तिकिटांमुळे चाहत्यांना सोपी होईल आणि प्रत्येकजण त्यांच्या जागेवर सहज पोहोचू शकेल.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे हॉकी पुरुष आशिया कप 2025 ट्रॉफीचे अनावरण केले. ही स्पर्धेची 12वी आवृत्ती आहे, जी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणार आहे.
𝙄𝙉𝘿𝙄𝘼, 𝘼𝙍𝙀 𝙔𝙊𝙐 𝙍𝙀𝘼𝘿𝙔 !!! 🤩
नायक एशिया कप, राजगीर, बिहार 2025 जवळजवळ येथे आहे – आणि आपली जागा प्रतीक्षा करीत आहे! 🙌
आरएसव्हीपी आता आणि कृतीत आशियातील सर्वोत्कृष्ट साक्षीदार होण्यासाठी आपली प्रशंसनीय प्रवेश सुरक्षित करा. 🏑✨
The हॉकी इंडिया अॅप डाउनलोड करा आणि आपली तिकिटे बुक करा… pic.twitter.com/ydnoi8zjqj
– हॉकी इंडिया (@थेहोकीइंडिया) 26 ऑगस्ट, 2025
हॉकी आशिया कप 2025 मध्ये भारताचे वेळापत्रक
29 ऑगस्ट: भारत हॉकी विरुद्ध चीन हॉकी
31 ऑगस्ट: भारत हॉकी विरुद्ध जपान हॉकी
1 सप्टेंबर: भारत हॉकी विरुद्ध कझाकस्तान हॉकी
भारताचा समावेश ‘अ’ गटात आहे, या गटात भारतासोबत चीन, जपान आणि कझाकस्तान आहेत. गट ‘ब’ मध्ये चायनीज तैपेई, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश आहेत. प्रत्यक्षात पाकिस्तानने या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले होते, त्यानंतर बांगलादेशचा समावेश करण्यात आला.
Comments are closed.