IND vs OMAN: टीम इंडियाने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल!!

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हन भारताने दोन बदल केले आहे. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान देण्यात आले.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारताने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली. संघाने पहिल्या सामन्यात यूएईला 9 विकेट्सने नंतर पाकिस्तानला सात विकेट्सने पराभूत केले.

दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर अर्शदीप सिंगला आज खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत. आज त्याला खास शतक करण्याची संधी असेल. तर हर्षित राणाही स्पर्धेतील पहिला सामना खेळत आहे.

स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आधीच सुपर -4 फेरी साठी पात्र ठरली आहे. त्यामुळे हा सामना संघासाठी सराव आहे. दरम्यान सुपर-4 मध्ये भारत 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी भिडेल.

भारताचे सुपर-4 फेरीतील सामने

विरुद्ध पाकिस्तान (21 सप्टेंबर)
विरुद्ध बांग्लादेश (24 सप्टेंबर)
विरुद्ध श्रीलंका (26 सप्टेंबर)

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारत: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यशक्रकसन), सूर्यकुमार यादव (कर्नाधर), टिळ वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अकसर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुल्दीप यादव

ओमान- आमिर कालीम, जतिंदर सिंग (कर्नाधर), हम्मद मिर्झा, विनायक शुक्ला, शाह फैजल, जिंक इस्लाम, आर्यन बिश्ट, मोहम्मद नादेम, शकील अहमद, सामय श्रीवास्तव, जितेन रामानंदी

Comments are closed.