ट्रॉफी घेऊन पळून गेलेल्या पाकिस्तानशी टीम इंडिया पुन्हा भिडणार, ACC कडून वेळापत्रकाची घोषणा
आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपचे वेळापत्रक अपडेट : आशिया कप 2025 जिंकूनही भारतीय संघाला अजून ट्रॉफी मिळालेली नाही. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या नीच वागणुकीमुळे टीम इंडिया ट्रॉफीशिवाय दुबईहून परतली होती. हा वाद अजून मिटलेलाच नव्हता की आशियाई क्रिकेट परिषदने (Asian Cricket Council) एक नवीन स्पर्धेची घोषणा केली आहे, ज्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपचं वेळापत्रक जाहीर
आशियाई क्रिकेट परिषदने आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 16 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक थरारक सामना होणार आहे. पूर्वी इमर्जिंग आशिया कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा आता 14 ते 23 नोव्हेंबरदरम्यान कतारच्या दोहा येथील वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, ओमान, यूएई आणि हाँगकाँग हे एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकाच गटात ठेवण्यात आले आहे.
स्टेज तयार आहे, तारे तयार आहेत 🤩
ज्वलंत संघर्षांपासून ताज्या प्रतिस्पर्ध्यांपर्यंत ~ हे सर्व दोहा, कतारमध्ये उलगडते! 🇶🇦
येथे तुमचा पहिला देखावा आहे #DPWorldAsiaCupRisingStars2025 फिक्स्चर 🫡
कोण वर येईल? 👀#ACC pic.twitter.com/gze3cb1xmt
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) ३१ ऑक्टोबर २०२५
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात
कसोटी खेळणारे पाच आशियाई देश आपापल्या ‘अ’ संघांना उतरवतील, तर यूएई, ओमान आणि हाँगकाँग आपले वरिष्ठ (सीनियर) संघ घेऊन या चॅम्पियनशिपमध्ये खेळतील. एकूण 15 टी20 सामने खेळवले जातील. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे पहिल्या गटात आहेत. दुसऱ्या गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सुपर-4 टप्पा नसेल, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अफगाणिस्तानने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
वैभव सूर्यवंशीला संघात संधी
मागील हंगामात भारतीय संघात अभिषेक शर्मा, राहुल चाहर, प्रभसिमरन सिंग, साई किशोर आणि अंशुल कंबोज यांसारखे खेळाडू होते, आणि तिलक वर्मा कर्णधार होता. यंदाच्या रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पूर्ण झाली असून त्यात वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे. बीसीसीआय लवकरच संपूर्ण संघाची घोषणा करणार आहे. दरम्यान, अंडर-19 आशिया कप डिसेंबरमध्ये खेळवला जाणार आहे, मात्र त्याच्या तारखा आणि ठिकाण अजून निश्चित झालेले नाहीत.
आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 वेळापत्रक
- 14 नोव्हेंबर, पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध ओमान – दुपारी 12 वा.
- 14 नोव्हेंबर, भारत ‘अ’ विरुद्ध यूएई – संध्याकाळी 5 वा.
- 15 नोव्हेंबर, बांगलादेश ‘अ’ विरुद्ध हॉंगकॉंग – दुपारी 12 वा.
- 15 नोव्हेंबर, श्रीलंका ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
- 16 नोव्हेंबर, यूएई विरुद्ध ओमान – दुपारी 12 वा.
- 16 नोव्हेंबर, भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
- 17 नोव्हेंबर, श्रीलंका ‘अ’ विरुद्ध हॉंगकॉंग – दुपारी 12 वा.
- 17 नोव्हेंबर, बांगलादेश ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
- 18 नोव्हेंबर, पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध यूएई – दुपारी 12 वा.
- 18 नोव्हेंबर, भारत ‘अ’ विरुद्ध ओमान – संध्याकाळी 5 वा.
- 19 नोव्हेंबर, अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध हॉंगकॉंग – दुपारी 12 वा.
- 19 नोव्हेंबर, श्रीलंका ‘अ’ विरुद्ध बांगलादेश ‘अ’ – संध्याकाळी 5 वा.
सेमीफायनल आणि फायनल
- 21 नोव्हेंबर, सेमीफायनल 1: गट अ1 विरुद्ध गट ब2 – दुपारी 12 वा.
- 21 नोव्हेंबर, सेमीफायनल 2: गट अ2 विरुद्ध गट ब1 – संध्याकाळी 5 वा.
23 नोव्हेंबर
अंतिम सामना – संध्याकाळी 5 वा.
प्रत्येक दिवशी पहिला सामना दुपारी 12 वाजता व दुसरा सामना संध्याकाळी 5 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) खेळला जाईल.
आणखी वाचा
Comments are closed.