वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे करणार ओपनिंग! श्रीलंकाविरुद्ध उपांत्य फेरीत अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
एसीसी (ACC) पुरुष अंडर-19 आशिया चषक 2025 चा पहिला उपांत्य सामना दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) यांच्यात रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत तिन्ही सामने सहज जिंकून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता हीच लय कायम राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज असून, सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) यांच्यावर असेल.
वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे ही फॉर्मात असलेली जोडी डावाची सुरुवात करेल. तिसऱ्या क्रमांकावर अॅरॉन जॉर्ज खेळू शकतो, ज्याने पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम खेळी केली होती.
आरसीबीने (RCB) करारबद्ध केलेले विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान पहिल्यांदाच मैदानात उतरताना दिसतील. विहान फलंदाजीत तर कनिष्क बॅट आणि बॉल अशा दोन्ही क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. द्विशतक झळकावणारा हा यष्टीरक्षक फलंदाज आपल्या फॉर्मचा फायदा उठवण्यासाठी सज्ज आहे.
वेगवान गोलंदाजीत दीपेश देवेंद्रेन, किशन कुमार सिंह आणि हेनिल पटेल ही त्रिमूर्ती प्रभावी ठरत आहे. फिरकीमध्ये खिलान पटेलवर मोठी जबाबदारी असेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
भारतीय महासंघ (भारत अंडर-19):
आयुष म्हात्रे (कर्ंधर), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), खिलन पटेल, दीपेश देवेंद्रेन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, कनिष्क चौहान.
श्रीलंका अंडर-19:
विमथ दिनसारा (कर्णधार), कविजा गमागे, दिमंथा महाविथाना, विरन चामुदिथा, दुलनीथ सिगेरा, चामिका हीनातिगाला, आधम हिल्मी (विकेटकीपर), किथमा विथानापथिराना, सेठमिका सेनेविरत्ने, सनुजा निंदुवारा, कुगाथास मथुलन.
Comments are closed.