Asia Cup : 'या' 2 खेळाडूंची झाली एंट्री, आकाश चोप्राने जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग 11
आशिया कप 2025 मधील आजचा गट-साखळीतील शेवटचा सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळला जाणार आहे. सुपर-4 साठी चार संघ आधीच आपली तिकिट पक्की करून बसले आहेत, त्यामुळे हा सामना फक्त औपचारिकता म्हणून उरला आहे. टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण सुपर-4 पूर्वी बेंचवर बसलेल्या काही खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळू शकते. समोर ओमानसारखा कमजोर संघ असल्याने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचेही असेच मत आहे. त्यांना वाटते की कर्णधार सूर्या या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला विश्रांती द्यावी आणि विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यावी.
आकाश चोप्रा यांनी सल्ला दिला आहे की या सामन्यात टीम इंडियाने बदल करायला हवेत. जसप्रीत बुमराहला विश्रांती देता येईल, कारण 21 सप्टेंबरला सुपर-4 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याची भूमिका महत्त्वाची असेल. बुमराहच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला खेळवण्यावर त्यांनी भर दिला आहे. एवढेच नाही तर बुमराहसोबत हार्दिक पांड्यालाही विश्रांती द्यावी, आणि त्याच्या जागी हर्षित राणाला संधी द्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. आकाश चोप्रा यांच्या मते हे दोन बदल झाले तरी टीमवर फारसा परिणाम होणार नाही.
आकाश चोप्रा यांनी सांगितले की टीम इंडियाने टॉस जिंकून आधी फलंदाजी करावी. तसेच संजू सॅमसनला त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्लाही दिला.
आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 निवडली. ज्यामध्ये हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की अर्शदीप सिंगला का आणायला हवे. आकाश म्हणाले, “अर्शदीपला हा सामना खेळू दे रे, कारण अबू धाबीमध्ये थोडा जास्त उछाल आहे. मैदानही मोकळं असल्याने थोडी हवा वगैरेही फिरते. अशा परिस्थितीत तो उपयोगी ठरू शकतो.”
Comments are closed.