आशिया कपच्या ट्रॉफीवर ICC च्या बैठकीत फैसला? BCCI चा इशारा डावलनं मोहसीन नक्वीला महागात पडणार
नवी दिल्ली : भारतानं 28 सप्टेंबरला आशिया कप पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत करत जिंकला होता. मात्र, आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून अद्याप भारताला ट्रॉफी देण्यात आलेली नाही. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी मोहसीन नक्वींना इशारा दिला होता. दोन दिवसांमध्ये भारताला ट्रॉफी मिळाली तर ठीक अन्यथा 4 नोव्हेंबरच्या आयसीसीच्या बैठकीत हा मद्दा मांडणार असल्याचं सैकियांनी म्हटलं होतं. मात्र, नक्वींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बीसीसीआयनं नक्वींना ईमेल पाठवला होता मात्र नक्वीनं त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.
BCCI Warning To Naqvi: बीसीसीआयचा नक्वींना इशारा
वृत्तसंस्था पीटीआयच्या नुसार बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटलं होतं की आम्ही स्पर्धा जिंकल्यानंतर एक महिना झाला तरी भारतीय टीमला ट्रॉफी मिळाली नसल्याचं म्हटलं होतं. हे प्रकरण आता पुढं गेलं आहे. 10 दिवसांपूर्वी आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं, मात्र ते त्यांच्या भूमिकेवरुन मागं हटायला तयार नाही. ट्रॉफी अजूनही त्यांच्याकडे आहे. मात्र, ते एक दोन दिवसात ट्रॉफी देतील असं सैकिया म्हणाले होते. सैकियांनी ट्रॉफी मिळाली नाही तर आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडणार असल्याचं म्हटलं होतं.
आशिया कप ट्रॉफीवर अंतिम निर्णय कधी येणार?
दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक उद्या होणार आहे. बीसीसीआयचे प्रतिनिधी बैठकीत आशिया कपचा मुद्दा मांडू शकतात. आयसीसीकडून मध्यस्थी करुन उद्याच निर्णय दिला जाऊ शकतो. यापूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वींना सुनावलं होतं. आशिया कपच्या ट्रॉफीवर मोहसीन नक्वींचा खासगी मालकी हक्क नाही. भारतीय टीम आशिया कपची खरी दावेदार आहे. ट्रॉफी लवकरात लवकर द्यावी.मात्र, नक्वींनी ट्रॉफी दिलेली नाही.
मीडिया रिपोर्टसनुसार आयसीसीच्या बैठकीत मोबाइल गेमिंग राइटसची विक्री आणि अंडर-19 वर्ल्ड कपच्या फॉरमॅटवर चर्चा होऊ शकते. आयसीसीची बैठक 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत होईल. या बैठकीत हा मुद्दा मांडला जाऊ शकतो. दक्षिण अमेरिका आणि पॅन अमेरिकन गेम्समध्ये क्रिकेटला स्थान देण्याबाबत देखील चर्चा होऊ शकते.
आणखी वाचा
Comments are closed.