चला, मी तुमची ट्रॉफी देतो, पण…; मोहसीन नक्वीने भारतासमोर ठेवली एक अट, नेमकं काय म्हणाला?
एशिया कप ट्रॉफी इंड. वि पीएके: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) 28 सप्टेंबर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला.
आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एक प्रभावशाली पाकिस्तानी राजकारणी आहेत. संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने आशिया कप ट्रॉफी भारताला सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र ट्रॉफी देण्यासाठी एक अटही मोहसीन नक्वीने ठेवली आहे.
मोहसीन नक्वीने कोणती अट ठेवली? (Mohsin Naqvi set a condition)
ट्रॉफी सादरीकरणासाठी पुन्हा एक समारंभ आयोजित करा, अशी अट मोहसीन नक्वीने ठेवली आहे. परंतु असा समारंभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवस ट्रॉफीवरुन वाद कायम राहण्याची शक्यता दिसून येतेय.
भारतीय संघाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही? (Why didnt team india take Asia Cup trophy?)
पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला. भारताने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही, यामागील कारण आता समोर आलं आहे. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. “पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, असं देवजीत सैकिया (Devajit Saikia) म्हणाले. दरम्यान, पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला.
ट्रॉफीबाबत आयसीसीचे नियम काय?(ट्रॉफी संबंधित आयसीसी नियम?)
ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो.
संबंधित बातमी:
भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती
आणखी वाचा
Comments are closed.