Asia Cup 2025 – मोहसीन नक्वी ACC कार्यालयातून ट्रॉफी घेऊन गायब!

हिंदुस्थानने 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा पराभव आशिया चषक जिंकला. मात्र, मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने नकार दिला होता. तेव्हापासून सुरू झालेलं ट्रॉफी युद्ध अजूनही सुरू आहे. BCCI ने फटकारल्यानंतर मोहसीन नक्वींनी ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयात जमा केली होती. अशातच आता एक खळबळजनक माहिती समोर आली असून, मोहसीन नक्वींनी ट्रॉफी एसीसी कार्यालयातून अबुधाबी येथील अज्ञात स्थळी हलवली आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी BCCI चे अधिकारी एसीसीच्या कार्यालयामध्ये गेले होते. तेव्हा ट्रॉफी संदर्भात विचारणा करण्यात आली असता, ट्रॉफी कार्यालयातून घेऊन जाण्यात आल्याची माहिती मिळाली. ट्रॉफी अबुधाबीमध्ये असून मोहसीन नक्वींच्या जवळ असल्याचे वृत्त आहे. आता या सर्व प्रकारामुळे ट्रॉफीचा वाद पुन्हा एकदा पेटणार आहे. जवळपास एक महिना झाला आशिया चषक जिंकूनही टीम इंडियाला ट्रॉफी मिळालेली नाही.
एसीसीची वार्षिक बैठकीमध्ये बीसीसीआयने मोहसीन नक्वी यांना फटकारले होते. तसेच ट्रॉफी न दिल्यास आयसीसीकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला होता. तक्रार करण्याचा इशारा देताच नक्वींनी ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयात जमा केली होती. मात्र, आता ट्रॉफी एसीसी कार्यालयातूनच गायब झाल्याने हे ट्रॉफी युद्ध अजूनही सुरू राहणार असल्याचे चित्र आहे.

Comments are closed.