आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं?
दुबई: आशिया कप ट्रॉफीचा वाद संपवण्यासाठी बीसीसीआयनं मोठं पाऊल उचललं आहे. मिडिया रिपोर्टनुसार 7 नोव्हेंबरला आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयनं आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला. अखेर आयसीसीकडून हा वाद सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ज्यामुळं भारतीय संघाला ट्रॉफी लवकर मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
BCCCID SIAUUXUUUUUUUUUUUUUUUUUUX: बीसीसीआयने एशियास्ट ट्रॉफीच्या एशियास्ट कॉम्पीचा मुद्दा सादर केला आहे.
एनडीटीवीनुसार आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयनं आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला होता. आयसीसीच्या बोर्डाच्या सर्व सदस्यांनी म्हटलं की भारत आणि पाकिस्तान, दोन्ही क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे देश आहेत. मैत्रीपूर्ण पद्धतीनं या वादावर मार्ग काढला पाहिजे. आशिया कप ट्रॉफी वादासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ज्यानुसार या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाईल. कारण या बैठकीचा मुख्य हेतू आशिया कप ट्रॉफीचा नव्हता. त्यामुळं यावर विस्तारानं चर्चा झाली नाही.
भारतानं 28 सप्टेंबरला झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत केलं होतं. मात्र, फायनल नंतर टीम इंडियानं आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. टीम इंडियाला ट्रॉफी देण्याऐवजी मोहसीन नक्वी ती ट्रॉफी घेऊन गेले. आशिया कपची ट्रॉफी दुबईच्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात आहे. आयसीसीच्या बैठकीला मोहसीन नक्वी देखील उपस्थित होते अशी माहिती आहे.
दुबई मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते. भारतानं तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदा भारतानं ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले. त्यानंतर अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने सामने आले. भारतानं पाकिस्तानला तीन सामन्यात पराभूत करत आशिया कपची ट्रॉफी जिंकली होती. आशिया कपची ट्रॉफी भारतानं मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला होता कारण ते पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्री आहेत.
महिला वर्ल्ड कपमध्ये संघ वाढणार
आयसीसीच्या बैठकीत 2029 मध्ये होणाऱ्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या फॉरमॅटबाबत निर्णय घेण्यात आला. यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 8 संघ होते. आता पुढील वर्ल्ड कपमध्ये 10 संघ असतील. भारतानं 2025 च्या महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला होता.
आणखी वाचा
Comments are closed.