मोहसीन नक्वीने बीसीसीआयकडे मागितली माफी; ट्रॉफीबाबतही मोठं विधान, म्हणाला, सूर्यकुमार यादवने…
एशिया कप ट्रॉफी मोहसिन नकवी इंड वि पीएके: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारताने पाकिस्तानचा पराभव करत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मात्र आशिया चषकात जेतेपद पटकावूनही अद्याप भारतीय संघाला ट्रॉफी मिळालेली नाहीय. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. यानंतर बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच काल (30 सप्टेंबर) आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीतही ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी घडलेल्या प्रकाराबाबत एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीवर प्रश्नांची सरबत्ती केली. यानंतर मोहसीन नक्वीने उपरती घेत माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वीने बीसीसीआयकडे माफी मागितली. आपण नव्याने सुरुवात करु, क्रिकेटला मोठं करु, असं म्हणत मोहसीन नक्वीने उपरती घेतली. जे झालं ते व्हायला नको होतं, असंही मोहसीन नक्वी म्हणाले. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) स्वतः येऊन आशिया चषक न्यावा, असं मोहसीन नक्वीने सांगितले.
नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)
भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये पळाला होता.
https://www.youtube.com/watch?v=OLZXN0W8EP0
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.