पहिले ट्रॉफी घेऊन पळाला, आता नरेंद्र मोदींच्या पोस्टवर मोहसीन नक्वीच ट्विट, काय म्हणाला?


नरेंद्र मोदी पोस्टवरील मोहसिन नकवी: दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Final) यांच्यात काल (28 सप्टेंबर) अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताच्या या विजयानंतर देशभरात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील एक्सवर ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, भारताचा विजय…, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi On Asia Cup Final) पोस्ट करत म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या या पोस्टनंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीला चांगलीच मिरची झोंबल्याचे दिसून येत आहे. मोहसीन नक्वी नरेंद्र मोदींच्या पोस्टवर बरळला आहे. मोहसीन नक्वी म्हणाला की, जर युद्ध हे तुमच्या अभिमानाचे माप असेल, तर इतिहास पाहता पाकिस्तानकडून तुमचा अपमानजनक पराभव आधीच नोंदवला आहे. कोणताही क्रिकेट सामना ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही. खेळात युद्ध ओढल्याने केवळ निराशाच उघड होते आणि खेळाच्या भावनेचा अपमान होतो, असं विधान मोहसीन नक्वीने केलं आहे.

अमित शाह काय म्हणाले? (Amit Shah On Ind vs Pak)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. एक अद्भुत विजय. आमच्या मुलांच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे, असं अमित शाह म्हणाले.

कोणत्या खेळाडूंना कोणते पुरस्कार मिळाले?, यादी- (Which players received which awards?)

  1. गेम चेंजर – शिवम दुबे – 3500 डॉलर्स
  2. सर्वाधिक षटकार – तिलक वर्मा – 3500 डॉलर्स
  3. फायनलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू – तिलक वर्मा – 5000 डॉलर्स
  4. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – कुलदीप यादव – 15000 डॉलर्स
  5. मालिकेचा खेळाडू – अभिषेक शर्मा – 15000 डॉलर्स

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Shoaib Akhter Ind vs Pak Asia Cup Final 2025: भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं…

आणखी वाचा

Comments are closed.