मी माफी मागितली नाही, ट्रॉफी पाहिजे तर…; मोहसीन नक्वी पुन्हा बरळला, काय काय म्हणाला?


मोहसिन नकवी एशिया कप करंडक: एसीसीचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तथा पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीने (Mohsin Naqvi) दुबईत झालेल्या एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयकडे (BCCI) माफी मागितल्याची बातमी समोर आली होती. 30 सप्टेंबर रोजी एसीसीची दुबईत बैठक झाली. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून राजीव शुक्ला (Rajeev Shukla) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राजीव शुक्ला यांनी भारतीय संघाला ट्रॉफी न मिळाल्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर मोहसीन नक्वीने माफी मागितल्याचं समोर आलं होतं. परंतु मी कोणत्याही प्रकाराची माफी मागितलेली नाहीय, असं मोहसीन नक्वीने एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे.

मोहसीन नक्वी पोस्ट करत काय म्हणाला? (I did not apologize, said Mohsin Naqvi)

मोहसीन नक्वी पोस्ट करत म्हणाले की, भारतीय माध्यमे तथ्यांवर नव्हे तर खोट्या गोष्टींवर आधारित आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि बीसीसीआयची माफी मागितली नाही आणि कधीही माफी मागणार नाही. या खोट्या अफवा केवळ प्रचार आहेत, ज्याचा उद्देश केवळ आपल्याच लोकांना दिशाभूल करणे आहे, असं मोहसीन नक्वी म्हणाला.

मी ट्रॉफी देण्यास आजही तयार, पण… (What Mosin Naqvi Said)

मोहसीन नक्वी पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, दुर्दैवाने, भारताने क्रिकेटमध्ये सातत्याने राजकारण आणले आहे, ज्यामुळे खेळाच्या भावनेला धक्का बसला आहे. एसीसीचा अध्यक्ष म्हणून, मी त्या दिवशी देखील भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी देण्यास तयार होतो आणि आताही मी ट्रॉफी द्यायला तयार आहे. पण भारतीय संघाला ट्रॉफी हवी असेल तर ती त्यांनी एसीसीच्या कार्यालयात येऊन माझ्या हस्ते घ्यावी, असंही मोहसीन नक्वीने म्हटलं आहे.

मोहसीन नक्वीने माफी मागितल्याची समोर आली होती माहिती- (Asia Cup Trophy)

भारतीय माध्यमांमध्ये काल मोहसीन नक्वीने बीसीसीआयकडे माफी मागितल्याची माहिती समोर होती. आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जे झालं त्याबद्दल मी माफी मागतो. आपण नव्याने सुरुवात करु, क्रिकेटला मोठं करु, जे झालं ते व्हायला नको होतं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईत स्वतः येऊन आशिया चषक आणि पदकं न्यावी, असं मोहसीन नक्वीने म्हटल्याचं समोर आलं होतं. परंतु या सगळ्या अफवा आहेत, मी माफी मागितलेली नाहीय, असं मोहसीन नक्वीने स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातमी:

Shahid Afridi On Asia Cup Ind vs Pak: भारताचा पराभव केला असता तर…; पाकिस्तानने तयार केलेला धक्कादायक प्लॅन, शाहीद अफ्रिदीने सगळं सांगितलं!

Asia Cup Trophy Ind vs Pak: भारताला ट्रॉफी मिळणार की नाही?, 5 क्रिकेट बोर्ड ठरवणार, टीम इंडियाला कोणी कोणी पाठिंबा दिला, पाहा A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.