ट्रॉफी घेऊन पळाला, अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?


मोहसिन नकवी वर शाहिद आफ्रिदी: आशिया चषकाच्या स्पर्धेत (Ind vs Pak Asia Cup Final) अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एसीसीचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तथा पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन हॉटेलला निघून गेला. या सर्व घटनेनंतर मोहसीन नक्वीसह पाकिस्तानचा जगभारत अपमान झाला. त्यामुळे आता पाकिस्तानमधूनच मोहसीन नक्वीला विरोध सुरु झाला आहे. दरम्यान, आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहीद अफ्रिदीने (Shahid Afridi) मोहसीन नक्वीवर निशाणा साधला आहे.

शाहिद आफ्रिदीने आता मोहसीन नक्वीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि राजकारण यापैकी एक काहीतरी निवडण्यास सांगितले आहे. तसेच शाहीद अफ्रिदीने विशेषतः मोहसीन नक्वीच्या सल्लागारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहीद अफ्रिदीच्या या मागणीवरुन पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. (Shahid Afridi On Mohsin Naqvi)

शाहीद अफ्रिदी नेमकं काय म्हणाला?

मोहसीन नक्वीला माझी विनंती आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीपद ही दोन अतिशय महत्त्वाची पदे आहेत आणि ही मोठी कामे आहेत ज्यासाठी वेळ लागतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि गृहमंत्रालय हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि राजकारण यापैकी एक काहीतरी निवडा, असं शाहीद अफ्रिदी मोहसीन नक्वीला म्हणाला. हा निर्णय घेणं सोपे नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्राधान्य असले पाहिजेॉ. पाकिस्तान क्रिकेटला विशेष लक्ष आणि वेळेची आवश्यकता आहे. मोहसीन नक्वी केवळ सल्लागारांवर अवलंबून राहू शकत नाहीत, असंही शाहीद अफ्रिदीने सांगितले.

मोहसीन नक्वीचा राजीनामा घ्या, पाकिस्तानमधील राजकीय पार्टीची मागणी-

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते मुनीस इलाहीने मोहसीन नक्वीवर पाकिस्तानी क्रिकेट उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच मोहसीन नक्वीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदावरुनही हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात हिंमत असेल तर मोहसीन नक्वीचा राजीनामा घ्यावा, असं आव्हानही मुनीस इलाहीने दिलं आहे. त्यामुळे आता मोहसीन नक्वीला पदावरुन हटवणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)

भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Shahid Afridi On Asia Cup Ind vs Pak: भारताचा पराभव केला असता तर…; पाकिस्तानने तयार केलेला धक्कादायक प्लॅन, शाहीद अफ्रिदीने सगळं सांगितलं!

Asia Cup Trophy Ind vs Pak: भारताला ट्रॉफी मिळणार की नाही?, 5 क्रिकेट बोर्ड ठरवणार, टीम इंडियाला कोणी कोणी पाठिंबा दिला, पाहा A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.