आधी ट्रॉफी घेऊन पळाला, आता माज उतरला; मोहसीन नक्वी BCCI ला माफी मागत काय काय म्हणाला?


एशिया ट्रॉफी इंड. वि पीएके वर मोहसिन नकवी: एसीसीचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तथा पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीने (Mohsin Naqvi) अखेर बीसीसीआयसमोर हात जोडले. दुबईत काल झालेल्या आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) बैठकीनंतर मोहसीन नक्वीने (Mohsin Naqvi) बीसीसीआयकडे (BCCI) माफी मागितली.

मोहसीन नक्वी BCCI ला माफी मागत काय म्हणाला? (Mohsin Naqvi Apologized To BCCI)

आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जे झालं त्याबद्दल मी माफी मागतो. आपण नव्याने सुरुवात करु, क्रिकेटला मोठं करु, जे झालं ते व्हायला नको होतं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दुबईत स्वतः येऊन आशिया चषक आणि पकदं न्यावी, असं मोहसीन नक्वी म्हणाला.

मोहसीन नकविला पाकिस्तानमाधुची विरोधा- (शाहिद आफ्रिदीवरील मोहसिन नकवी)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहीद अफ्रिदीने (Shahid Afridi) मोहसीन नक्वीवर निशाणा साधला आहे. मोहसीन नक्वीला माझी विनंती आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीपद ही दोन अतिशय महत्त्वाची पदे आहेत आणि ही मोठी कामे आहेत ज्यासाठी वेळ लागतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि गृहमंत्रालय हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि राजकारण यापैकी एक काहीतरी निवडा, असं शाहीद अफ्रिदी मोहसीन नक्वीला म्हणाला. हा निर्णय घेणं सोपे नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्राधान्य असले पाहिजेॉ. पाकिस्तान क्रिकेटला विशेष लक्ष आणि वेळेची आवश्यकता आहे. मोहसीन नक्वी केवळ सल्लागारांवर अवलंबून राहू शकत नाहीत, असंही शाहीद अफ्रिदीने सांगितले.

आशिया चषकाच्या फायनलनंतर नेमकं काय घडलं? (Asia Cup Trophy Controversy)

28 सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही.

https://www.youtube.com/watch?v=_e2wntuukks

संबंधित बातमी:

Shahid Afridi On Asia Cup Ind vs Pak: भारताचा पराभव केला असता तर…; पाकिस्तानने तयार केलेला धक्कादायक प्लॅन, शाहीद अफ्रिदीने सगळं सांगितलं!

Asia Cup Trophy Ind vs Pak: भारताला ट्रॉफी मिळणार की नाही?, 5 क्रिकेट बोर्ड ठरवणार, टीम इंडियाला कोणी कोणी पाठिंबा दिला, पाहा A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.