Asian Games 2026: बाबर-शाहीन आऊट! नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा धक्कादायक संघ जाहीर

सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान जपानच्या ऐची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीड स्पर्धेसाठी पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने त्यांचा १५ सदस्यीय संघ निवडला आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच संघातून नियमित कर्णधार सलमान अली आगा, बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांना वगळले आहे.

टी२० मध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या साहिबजादा फरहान याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्याने २०२६ च्या टी२० विश्वचषकात ७६.६० च्या सरासरीने ३८३ धावा केल्या होत्या. तो त्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने अद्याप पाकिस्तानचे मर्यादित षटकांमध्ये कर्णधारपद भूषवलेले नाही. हा आक्रमक सलामीवीर पाकिस्तानचा टी२० मधील सर्वोत्तम खेळाडू आहे.

तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने जाहीर केलेल्या संघात अशा काही नवख्या खेळाडूंचा सहभाग आहे, ज्यांनी अद्याप टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पणही केलेले नाही. त्यामध्ये अकिफ जावेद, अली रझा, माझ सदाकत आणि साद मसूद यांचा समावेश आहे. उस्मान खान याची विकेटकीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

अब्दुल समदची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, ज्याने केवळ पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तसेच तो गेल्या वर्षी मार्चपासून पाकिस्तानसाठी या प्रकारामध्ये खेळलेला नाही.

निवडलेल्या खेळाडूंपैकी काही जण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाकिस्तानच्या तयारीमध्ये सहभागी आहेत. आशियाई क्रीडा संघातील चौदा सदस्य देखील एनसीएसच्या व्हाईट बॉल शिबिराचा भाग आहे, जे १५ जून रोजी लाहोरमध्ये सुरू होणार आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूषांचे सामने २४ सप्टेंबर रोजी सुरू होईल, तर पदकांचे सामने ३ ऑक्टोबर रोजी खेळले जातील.

आशियाई खेळ २०२६ साठी पाकिस्तानचा पुरुष क्रिकेट संघ – साहिबजादा फरहान (कर्ंधर), अब्दुल समद (उक्करंधर), अबरार अहमद, अहमद दानियाल, अकिफ जावेद, अली रझा, अराफत मिन्हास, हैदर अली, हसन नवाज, माझ सदकत, मोहम्मद सलमान मिर्झा, साद मसूद, सॅम अयुब, सुफियान खान, मोहम्मद सलमान मिर्झा.

Comments are closed.