Asian Games 2026 – 44 वर्षांची प्रतीक्षा संपली, हॉकीत महिला संघाने जिंकले सुवर्ण, ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने चीनचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आणि 44 वर्षांची प्रतीक्षा संपवली. अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला संघाने दमदार खेळ करत चीनचा 1-0 असा पराभव केला. या विजयामुळे 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये महिला संघाला थेट प्रवेश मिळाला आहे.
!
भारतीय महिला हॉकी संघ आशियाई क्रीडा 2026 च्या सुवर्णपदकाच्या सामन्यात चीनवर 1-0 ने आघाडी घेऊन हाफ टाईममध्ये पोहोचला!
लालरेमसियामीचा अप्रतिम गोल आणि पेनल्टी स्ट्रोक… pic.twitter.com/q1vkCyigdd
– हॉकी इंडिया (@TheHockeyIndia) 2 ऑक्टोबर 2026
Comments are closed.