India Pakistan Tensions – हारलेल्या जनरलचे पाकिस्तानने केले प्रमोशन, असीम मुनीरला बनवले फिल्ड मार्शल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेश सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून हिंदुस्थानी सैन्याने कारवाई केली. या कारवाईमुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली. पण हिंदुस्थानच्या या सैन्य कारवाईनंतरही पाकड्यांची शेपूट वाकडीच आहे. हिंदुस्थानवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत पाकिस्तानने लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरचे प्रमोशन केले आहे. मुनीरला फिल्ड मार्शल बनवले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुनीरच्या प्रमोशनचा निर्णय घेण्यात आला. ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवसह पाकची हवाई तळंही उद्ध्वस्त केली. त्याचे पुरावेही हिंदुस्थानच्या सैन्याने दिले. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख म्हणून जनरल असीम मुनीरचा कार्यकाळ बघितल्यास मुनीर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही पाकिस्तानने मुनीरचे प्रमोशन केले आहे. असीम मुनीरसह एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांचाही कार्यकाळ वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक?
जनरल अयूब खाननंतर असीम मुनीर हा पाकिस्तानचा दुसरा फिल्ड मार्शल झाला आहे. असीम मुनीरच्या प्रमोशनला पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तर जनरल अयुब खाने स्वतःला फिल्ड मार्शल घोषित केले होते. जनरल सय्यद असीम मुनीर हा 2022 पासून पाक सैन्याचा प्रमुख आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याचा तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून तो पाच वर्षांचा करण्यात आला होता. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख होण्यापूर्वी असीम मुनीर हा पाकची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख होता.
Comments are closed.