खरातसोबत मीटिंग ठेवतात, भेटायला जातात; महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? असीम सरोदे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
केवळ अशोक खरातसोबत फोटो असल्यामुळे कुणावरही कारवाई होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. त्यावरुन कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ”खरातसोबत मीटिंग ठेवतात, भेटायला जातात; महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? असा सवाल करत सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ट्विटरवरून याबाबत त्यांनी एक पोस्ट केली आहे.
”क खरात यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून होती का?, अशोक खरात शास्त्रज्ञ आहेत का? 2004 पासून खरात हा माणूस अंकशास्त्र, ज्योतिष्य हेच करत वाढलेला आहे. कुणी सहज एखाद्या कार्यक्रमात अचानक भेटला व त्याने सोबत फोटो काढला ती गोष्ट वेगळी पण तुम्ही त्याला विशेष करून भेटायला जाता किंवा त्याला बोलावून त्याच्यासोबत विशेष मिटिंग ठेवता आणि आता म्हणता कि, “खरातसोबत केवळ फोटो आहेत म्हणजे दोषी नाही”! व्वा ! मुख्यमंत्री साहेब…. व्वा व्वा! महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा ही संविधानिक जबाबदारी न पाळणारे आहात आणि खरात सोबत तुमचे विशेष फोटो आहेत त्यामुळे तुम्ही दोषी आहात”, असे सरोदे म्हणाले.
Comments are closed.