अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ले परतवून लावा! कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांचे आवाहन; रील स्टार अथर्व सुदामेला पाठिंबा

रील स्टार अथर्व सुदामे याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे त्याच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर त्याने तो व्हिडीओ डिलीट केला. मात्र, धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे चिंताजनक आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत, असे मत कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. ‘या लढ्यात मी अथर्वसोबत आहे,’ असेही ते म्हणाले.

अथर्व सुदामे याने हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारा गणेशोत्सव स्पेशल व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, टीका झाल्यानंतर त्याने व्हिडीओ डिलीट केला. या प्रकरणात अॅड. असीम सरोदे यांनीही अथर्वला पाठिंबा दर्शविला आहे.

गणेशोत्सवातील सर्वधर्म समभावाच्या रीलवरून वाद, ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर पोस्ट डिलिट; अथर्व सुदामेला कलाकार व मान्यवरांचा पाठिंबा

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात अथर्व सुदामेचे कौतुक केले होते,’ असे नमूद करून अॅड. सरोदे म्हणाले, ‘अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले आहेत. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी त्याला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असताना राज ठाकरे आणि मनसेने अथर्वच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. माझे राज ठाकरे यांच्याबरोबर बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडीओ पुन्हा पोस्ट करावा. कोण काय करतेय ते बघूया !’

लोकांचे व्यापक मत हे अथर्वच्या बाजूने आहे. धार्मिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव ही संविधानातील मूल्ये सांगणारा तो व्हिडीओ आहे. त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर आक्षेप घेणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. अशा धमक्या देणे योग्य नाही.

अॅड असीम सरोदे कायदेतज्ज

Comments are closed.