आसाम मंत्रिमंडळाचा विस्तार ५ जून रोजी होणार आहे

मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मांनी दिली माहिती

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 5 जून रोजी होणार असल्याचे शर्मा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले आहे. अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 126 पैकी 102 जागा जिंकून रालोआने ऐतिहासिक विजय मिळविला होता. त्यानंतर 12 मे रोजी शर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मुख्यमंत्र्यांसोबत रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर आता होणाऱ्या विस्ताराद्वारे मंत्रिमंडळातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच काही वर्तमान मंत्र्यांच्या विभागांमध्येही फेरबदल केला जाऊ शकतो. रामेश्वर तेली यांना परिवर्तन आणि विकास, श्रम कल्याण तसेच आदिवासी कल्याण विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अतुल बोरा हे ग्रामीण विकास, आसाम करार क्रियान्वयन, सीमा संरक्षण तसेच अबकारी विभागाची जबाबदारी सांभाळून आहेत.

Comments are closed.