प्राध्यापक व्हायचंय? हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार, 71 महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त

सहाय्यक प्राध्यापक भरती: तुम्ही जर प्राध्यापक होण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. हजारो पदांसाठी प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. उत्तर प्रदेशात लवकरच सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू होणार आहे. ज्यासाठी शिक्षण संचालनालयाने भरती प्रक्रिया अंतिम केली आहे. या सर्व भरती उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC) मार्फत केल्या जातील. ज्यासाठी रिक्त पदांची माहिती शिक्षण संचालनालयाकडून शक्य तितक्या लवकर UPPSC ला पाठवली जाईल.

शिक्षण संचालनालयाने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाला 23 विषयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या 562 रिक्त पदांबद्दल माहिती पाठवली होती. ज्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाऊ शकते. आता 71 नवीन पदवी महाविद्यालयांसाठीही भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. ज्यामुळे सहाय्यक पदांची संख्या वाढली आहे.

1698 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती होणार

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने आगामी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये सरकारी पदवी महाविद्यालयांमध्ये 1698 सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची योजना आखली आहे. उच्च शिक्षण संचालक अमित भारद्वाज यांच्या मते, राज्यातील 71 नवीन सरकारी महाविद्यालयांचे कामकाज सुरू करण्यासाठी सहाय्यक प्राध्यापकांच्या 1136 पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे भरण्यासाठी लवकरच यूपीपीएससीला माहिती दिली जाईल. यापूर्वी 23 विषयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या 562 पदांची माहिती यूपीपीएससीला देण्यात आली होती. अशाप्रकारे, सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची संख्या 1698 झाली आहे.

71 महाविद्यालयांमध्ये भरती केली जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 71 नवीन पदवी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 16 अतिरिक्त शिक्षक पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कला शाखेत आठ, विज्ञान शाखेत पाच, वाणिज्य शाखेत दोन आणि ग्रंथालय शाखेत एक सहाय्यक प्राध्यापक भरती करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील भरतीमध्ये यूपीपीएससीकडून या पदांसाठी अर्ज जारी केले जातील.

उमेदवारांसाठी एक मोठी संधी

दरम्यान, जे उमेदवार प्राध्यापक होण्यासाठी तयारी करत आहेत, किंवा ज्यांचे त्या पात्रतेचे शिक्षण झाले आहे. अशा उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यास अडचण नाही. हजारो पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळं तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने आगामी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये सरकारी पदवी महाविद्यालयांमध्ये ही भरती करणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी, पगार मिळणार 63000, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.