Astronomy Meteor shower in 2025, supermoon will catch attention of astronomy lovers PPK
नववर्षामध्ये आकाश निरीक्षणप्रेमींना अकाशातील विविध गोष्टी पाहण्याची आणि अनुभवण्याची मोठी संधी मिळणार आहे. ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी याबाबतची माहिती दिली.
मुंबई : अवकाशात नेहमीच विविध खगोलीय घटना घडत असतात. परंतु, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण किंवा उल्कावर्षाव सोडता सामान्य नागरिकांना इतर खगोलीय घटनांची फारशी माहितीच नसते. त्यामुळे आता ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी कोणत्या दिवशी उल्कावर्षाव होणार, कोणत्या दिवशी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दिसणार आणि कोणत्या दिवशी सूपरमून म्हणजेच चंद्राला पृथ्वीच्या जवळ आल्याचे पाहता येणार, याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे नववर्ष अर्थात 2025 हे वर्ष खगोलप्रेमींसाठी अत्यंत औत्सुक्याचे असणार आहे. (Astronomy Meteor shower in 2025, supermoon will catch attention of astronomy lovers)
नववर्षामध्ये आकाश निरीक्षणप्रेमींना अकाशातील विविध गोष्टी पाहण्याची आणि अनुभवण्याची मोठी संधी मिळणार आहे. ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुटणाऱ्या ताऱ्यांच्या स्वरूपात दिसणारा विविधरंगी उल्कावर्षाव वर्षारंभी 3 जानेवारीला होईल. त्यानंतर 22 एप्रिल, 05 मे, 28 जुलै, 12 व 13 ऑगस्ट, 05, 12 व 17 नोव्हेंबर, 14 व 22 डिसेंबरच्या रात्री या अवकाशातील दिवाळीत सहभागी होता येणार आहे. त्याशिवाय, नव्या वर्षात सूर्य- चंद्राची प्रत्येकी दोन अशी एकूण चार ग्रहणे होणार असून, यापैकी फक्त एकच खग्रास चंद्रग्रहण जे 07 सप्टेंबर रोजी होणार आहे ते सुमारे साडेतीन तास बघता येणार आहे.
– Advertisement –
हेही वाचा… Thane : पंतप्रधानांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रॉपर्टी कार्डचे वितरण
चंद्र आणि ग्रह यांची युती दरमहा घडत असून, ग्रह व ग्रहांची युती एक अनोखी अनुभूती देते. अशी स्थिती 18 जानेवारीला पश्चिमेस शुक्र व शनि, 25 फेब्रुवारीला बुध व शनि, 11 मार्चला बुध व शुक्र, 15 व 25 एप्रिल रोजी अनुक्रमे बुध व शनि, शुक्र आणि शनि, 08 जूनला बुध व गुरु, 14 ऑगस्टला गुरू आणि शुक्र एकमेकांच्या जवळ पाहता येतील. 14 मार्चचे खग्रास चंद्रग्रहण, 29 मार्च आणि 21 सप्टेंबरचे खंडग्रास सूर्यग्रहण मात्र भारतात दिसणार नाही. तर, पौर्णिमेला पृथ्वीपासून चंद्र जवळ असतो तेव्हा चंद्रबिंब मोठ्या आकाराचे व अधिक प्रकाशित दिसते, अशी स्थिती यावर्षी 7 ऑक्टोबर, 5 नोव्हेंबर आणि 5 डिसेंबरच्या रात्री बघता येईल. यातील कार्तिक पौर्णिमेला या वर्षातील सर्वात मोठा व प्रकाशमान चंद्र असेल. पृथ्वी अधिक सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरताना या दोन्हीतील अंतर कमी-अधिक होत असते. येत्या 4 जानेवारीला हे अंतर 14 कोटी 70 लाख कि. मी. एवढे राहील तर 4 जुलैला हे अंतर 15 कोटी 20 लाख कि. मी. असेल.
Comments are closed.