रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला, 10 जणांचा मृत्यू; ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी तणाव वाढला

युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. रशियाने शनिवारी युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले. हा हल्ला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची सोमवारी होणाऱ्या नियोजित भेटीच्या आधीच झाल्याने तणाव वाढला आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने 127 ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर करून युक्रेनच्या अनेक भागांवर हल्ले केले. यामध्ये सुमी, झापोरिझिया, पोल्टावा आणि खार्किव्ह या क्षेत्रांचा समावेश आहे. सुमी प्रांतात 100 हून अधिक ड्रोन आणि मिसाइल्सनी हल्ला झाला, ज्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला 13 जण जखमी झाले. पोल्टावामध्येही रशियन हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, जिथे एका व्यक्तीचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाले. याशिवाय, इतर भागांमध्येही नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद आहे. रशियाने या हल्ल्यांदरम्यान 80 ड्रोन आणि विविध मिसाइल्सचा वापर केला, ज्यापैकी युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने 60 ड्रोन आणि मिसाइल्स यशस्वीपणे नष्ट केली.
Comments are closed.