ब्राझीलमध्ये गेल्या १५ दिवसांतील हा तिसरा मोठा अपघात, दोन राज्यांना जोडणारा पूल कोसळला, दोघांचा मृत्यू; अनेक बेपत्ता

साओ पाउलो: ब्राझीलमध्ये गेल्या चार दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. ब्राझीलच्या दोन उत्तरेकडील राज्यांना जोडणारा पूल कोसळल्याने किमान दोन जण ठार झाले असून डझनभर जण बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

सल्फ्यूरिक ऍसिडच्या गळतीमुळे बचाव कार्य गुंतागुंतीचे झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी मिळवलेल्या फुटेजमध्ये रविवारी जुसेलिनो कुबित्शेक डी ऑलिव्हेरा ब्रिज ओलांडताना कार आणि ट्रक दाखवले. त्यानंतर पुलाचा मोठा भाग नदीत पडला.

परदेशी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा करा

मारनहाओ आणि टोकँटिन्स या उत्तरेकडील राज्यांच्या सीमेवर काम करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, आठ वाहने बेपत्ता आहेत. ज्यामध्ये चार ट्रक, दोन कार आणि दोन मोटारसायकल आहेत. पोलीस आणि ब्राझीलच्या रस्ते विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सांगितले.

पूल कोसळल्याचा व्हिडिओ

विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला

याआधी रविवारी ब्राझीलच्या दक्षिणेकडील ग्रामाडो शहरात छोटे विमान कोसळले. ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. रिओ ग्रांडे डो सुल राज्याच्या सार्वजनिक सुरक्षा कार्यालयानुसार, किमान 15 लोकांना शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेतून निघणाऱ्या आगीमुळे आणि धुरामुळे यातील बहुतांश जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

बस-ट्रक आणि कारच्या धडकेत 41 जणांचा मृत्यू झाला

दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये शनिवारी प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली. दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील मिनास गेराइस राज्यातील महामार्गावर हा अपघात झाला. 22 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. यानंतर मृतांची संख्या 30, नंतर 38 आणि नंतर 41 झाली.

Comments are closed.