Pregnancy Delivery Tips: प्रेग्नन्सीच्या कोणत्या आठवड्यात प्रसूतीची तयारी करावी?

प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या आयुष्यात अनेक चढ उतार होतात. या दरम्यान शरीरात देखील अनेक बदल होतात. मात्र यादरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे हे गरजेचे आहे. जसे की प्रेग्नन्सीच्या कोणत्या आठवड्यात दवाखान्यात दाखल होण्याची तयारी करावी आणि दवाखान्यात काही महत्त्वाच्या गोष्टी बॅगमध्ये सोबत असायला पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया…

36 किंवा 37 व्या आठवड्यात तयारी

गरोदरपणाच्या 36 व्या आणि 37 व्या आठवड्याच्या दरम्यान दवाखान्याची तयारी करायला पाहिजे. म्हणजेच यामुळे प्रसूतीसाठी तुमची मानसिक तयारी देखील होते. कारण अनेकदा दिलेल्या तारखेपूर्वीही डिलिव्हरी होत असते. अशा परिस्थितीत पूर्व तयारी गरजेची आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी धावपळ होणार नाही.

हे लक्षात ठेवा

दवाखान्यात जाण्यासाठी बॅग पॅक करताना त्यामध्ये काही आवश्यक गोष्टी ठेवा. जर तुमची नैसर्गिक प्रसूती झाली तर तुम्हाला फक्त एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल तेव्हा तुम्हाला जास्त गोष्टींची आवश्यकता भासणार नाही. मात्र याउलट जर सी-सेक्शनद्वारे प्रसूती होणार असेल तर तुम्हाला ४ ते ५ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागू शकते. म्हणून बॅग पॅक करण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरांशी डिलिव्हरी प्लॅनबद्दल चर्चा करा.

बॅगेत काय असावे?

आईसाठी आवश्यक गोष्टी

बॅगेत आईसाठी आवश्यक गोष्टी असल्या पाहिजे. जसे की, दूध पाजण्यासाठी गाऊन, मॅटरनिटी पॅड्स, काही अधिकचे ड्रेस, टॉवेल, इनर वेअर, टिश्यू, हेअरब्रश, टूथब्रश, टूथपेस्ट, फेस वॉश, बॉडी वॉश, हेअर टाय, बॉडी लोशन, मोजे, स्कार्फ. या सर्व गोष्टींसह, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्यासोबत फीडिंग पिलो देखील घेऊ शकता.

बाळासाठी आवश्यक गोष्टी

बाळासाठी बॅगेत बॉडी सूट, डायपर, सॉक्स, वेट वाइप्स, सुती कापड, कॉटन कॅप, बेबी नेस्ट, बेबी रॅपर, ड्राय शीट, सॉफ्ट ब्लँकेट आणि ड्रेस. याशिवाय, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रॅश क्रीम, बेबी लोशन देखील पॅक करू शकता.

Comments are closed.