अटलजींची जन्मशताब्दी देशभरात साजरी झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिवादन, हा दिवस ‘सुशासन दिन’ म्हणून मानांकित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे संस्थापक आणि दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी साऱ्या देशात साजरी करण्यात आली आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या संदेशातून बुधवारी अभिवादन पेले. 25 डिसेंबर 1924 या दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता. निष्णात मुत्सद्दी, अमोघ वक्ते आणि अजातशत्रू व्यक्तित्वामुळे वाजपेयी यांनी आपला राजकीय कार्यकाळ गाजविला होता. देशाचे सर्वोच्च नेतेपद त्यांनी तीन वेळा भूषविले होते. दिवंगत राष्ट्रनेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त मी त्यांना सन्मानपूर्वक अभिवादन करीत आहे. एक समर्थ, बळकट आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. विकसीत भारताच्या निर्माणकार्यात त्यांची दूरदृष्टी आणि कार्य सातत्याने देशाला प्रेरणा देत राहील. वाजपेयींच्या महान कार्याचा वारसा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनानिमित्त आपला संदेश दिला आहे.

सुशासन दिवस

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मशताब्दी दिवस ‘सुशासन दिन’ म्हणून ओळखला जाणार आहे. सरकारने सत्ता हा भाव न बाळगता सेवा हा भाव बाळगून काम करणे, हा सुशासन या शब्दाचा अर्थ आहे. या पवित्र दिवसापासून आपण सर्वांनी देशाच्या विकासासाठीची आपली उच्च ध्येये साकार करण्याचा निर्धार केला पाहिजे. वाजपेयी यांनी जीवनभर केलेल्या महान कार्यातून हाच संदेश आपल्या सर्वांना दिला असून जनतेची सरकारकडून ‘सुशासना’चीच अपेक्षा आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात पुढे प्रतिपादन केले आहे.

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आदर्श

अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखविली. हाच सांस्कृतिक राष्ट्रवाद आज देशाची कार्यसंस्कृती बनला आहे. वाजपेयी हे त्यांच्या कार्यामुळे भारताचे ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले गेले. त्यांनी त्यांच्या संयमित आणि निष्कलंक राजकीय जीवनाच्या आधारावर भारतीय जनता पक्षाला देशाच्या सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय केले. विकासाच्या पथावर साऱ्या देशाला ते अनंत काळापर्यंत ध्रूवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करत राहतील, अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही वाजपेयींना अभिवादन केले आहे.

राजकारणाला नवी दिशा

अलटबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार यांच्या माध्यमातून भारतीय राजकारणातील एकात्मता आणि सेवाभाव या गुणांना नवी उंची मिळवून दिली. देशाच्या राजकारणाला त्यांनी एक नवी दिशा दिली. भारताला जागतिक महासत्ता बनविण्याच्या कार्यात त्यांचे योगदान असाधारण आहे. त्यांचा जन्मदिन  भारताच्या सर्वांगिण विकासासाठीच्या प्रयत्नांचे महत्वाचे प्रतीक आहे, अशी भलावण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी केली आहे.

स्वतंत्र राजकारणाचा आधारस्तंभ

वाजपेयी यांनी आपली एक स्वतंत्र राजकीय शैली विकसीत केली होती. ते स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा एक आधारस्तंभ होते. राजकारण आणि मुत्सद्देगिरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी नवे आदर्श निर्माण केले. त्यांनी भारताला एक समर्थ आणि वैभवी राष्ट्र बनविण्याचा ध्यास घेतला होता. भारताच्या विकासातील त्यांच्या योगदानाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले. त्यांनीही वाजपेयींना अभिवादन केले आहे.

महानतेचा जीवनपट

ड अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 या दिवशी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. आपल्या विद्यार्थीदशेतच त्यांनी समाजकार्याचा प्रारंभ केला. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला. काही काळ ते मार्क्सवादी विचारानेही भारलेले होते.

ड 1951 मध्ये त्यांनी दिवंगत बलराज मधोक आणि अन्य नेत्यांसमवेत भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली. 1957 मध्ये ते जनसंघाचे नेते झाले. याच वर्षी ते प्रथमच लोकसभेचे सदस्यही झाले. 1968 मध्ये ते जनसंघाचे अध्यक्ष झाले. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला.

ड 1977 मध्ये त्यांनी अन्य नेत्यांसमवेत जनता पक्षाची स्थापनेत भाग घेतला. जनसंघ त्यांनी जनता पक्षात विलीन केला. जनपा पक्षाच्या पराभवानंतर 1980 मध्ये त्यातून बाहेर पडत त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. ते भारतीय जनता पक्षाचे प्रथम अध्यक्ष बनले. अध्यक्षपद त्यांनी 1986 पर्यंत सांभाळले.

ड 1992 मध्ये नरसिंह राव सरकारच्या काळात त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1996 मध्ये ते प्रथम देशाच्या सर्वोच्च नेतेपदी विराजमान झाले. मात्र, हे पद केवळ 13 दिवस टिकले. बहुमत सिद्ध होणे शक्य नव्हते. मात्र, इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने सर्वोच्च नेतेपदाला स्पर्श केला होता.

ड 1998 मध्ये ते पुन्हा सर्वोच्च नेतेपदी आरुढ झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. हे सरकार 13 महिने टिकले. याच कार्यकाळात त्यांनी राजस्थानातील पोखरण येणे अणुचाचणी घडवून नवा इतिहास घडविला. याच काळात त्यांनी भारत अण्वस्त्रधारी राष्ट्र झाल्याची महत्वपूर्ण घोषणाही केली.

ड 1999 मध्ये ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करत पुन्हा देशाच्या सर्वोच्च पदी आरुढ झाले. या पूर्वी त्यांच्या नेतृत्वात कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. त्यांच्या नेतृत्वात हे सरकार जवळजवळ पूर्ण काळ कार्यरत होते. पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण वाटाघाटी त्यांच्या काळात घडल्या होत्या.

ड 2004 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता सोडावी लागली. त्यानंतर वाजपेयी यांच्या राजकीय कार्यकाळाच्या सांगतेला प्रारंभ झाला. 2005 मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. 2015 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले. 2018 मध्ये त्यांचा देहांत झाला.

राजकीय कार्यकाळाची वैशिष्ट्यो

ड एकंदरीत दहा वेळा लोकसभेचे सदस्य. तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्य.

ड देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले भारतीय जनता पक्षाचे प्रथम नेते.

ड जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या तीन पक्षांचे संस्थापक.

ड पद्मविभूषण आणि भारतरत्न अशा दोन्ही नागरी पुरस्कारांनी सन्मानित.

ड 1977 मध्ये देशाच्या प्रथम काँग्रेसेतर सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री.

Comments are closed.