शिंदे गटाच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीड मधील मध्यरात्रीची घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आताच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे पडसाद अजूनही उमटत आहे, या निवडणुकीत पराभव जिव्हारी लागलेल्या शिंदे गटाच्या उमेदवाराने विजयी भाजप नगरसेविकेच्या पतीवर मध्य रात्री हल्ला केला, पाच ते सहा जणांनी मारहाण केली आणि उलट पोलिसातही त्यांनीच तक्रार दिली. या हल्ल्यात भाजप नगरसेवकीचे पती सागर देशपांडे यांना जबर मार लागला.

बीड नगर पालिकेच्या आताच पार पडलेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सात मध्ये भाजप अन् शिंदे गटाच्या उमेदवारात सरळ लढत झाली होती. यात भाजपच्या भाग्यश्री देशपांडे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार बाळासाहेब जाधव यांचा पराभव केला होता, पराभव जाधव यांच्या जिव्हारी लागला. गेल्या दोन महिन्यात त्यांनी विनाकारण शिवीगाळ करणे, धमक्या देणे असे प्रकार अनेकदा केले शुक्रवारी तर कहरच केला, मध्यरात्री देशपांडे यांच्या घरासमोर धिंगाणा घालत नगरसेवकीचे पती सागर देशपांडे यांच्या वर पाच ते सहा जणांनी हल्ला केला, या हल्ल्यात सागर देशपांडे यांना दुखापत झाली, त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे मोठा अनर्थ टळला, बाळासाहेब जाधव यांनी दारूच्या नशेत सागर देशपांडे यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्ध देशपांडे यांच्यावर गुन्हा, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

या मारहाणीत सागर देशपांडे जखमी झाले, मात्र शिंदे गटाच्या बाळासाहेब जाधव या हल्लेखोराने सागर देशपांडे यांच्या विरोधात तक्रार देताना या वादात कोठे ही सहभागी नसलेले त्यांचे वृद्ध वडील अरुणराव देशपांडे यांच्यावर ही गुन्हा दाखल करायला भाग पाडले, पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

Comments are closed.