ट्रम्प-झेलेन्स्की भेटीआधीच युक्रेनने रशियावर डागले 300 ड्रोन

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतरही रशिया व युक्रेनमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांनी घातलेल्या अटींमुळे भडकलेल्या युक्रेनने रशियावर 300 ड्रोन डागले आहेत. रशियन सैन्याने हे सगळे ड्रोन पाडल्याचे वृत्त आहे. ट्रम्प-पुतीन भेटीनंतर आता ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट होणार आहे. त्याआधीच युक्रेनने दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Comments are closed.