शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची गर्दी

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच नवरात्रोत्सवात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

मंदिरात शेवंती, अष्टर, गुलाब, जरबेरा, ऑर्किड, जिप्स, कामिनी, पाला लहरी इत्यादी प्रकारच्या 1000 ते 1200 किलो फुलांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चार खांबी व नामदेव पायरी येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सेवा विठ्ठल भक्त राम जांभुळकर पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे. घटस्थापने निमित्त कलश प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. याशिवाय सोळखांबी येथे गुलछडी, गुलाब व शेवंती यांचे लटकन करून लावण्यात आले आहे.

Comments are closed.