W,W,W,W… मैदानात घडला इतिहास, असा पराक्रम याआधी कधीच झाला नव्हता; जम्मू-काश्मीरच्या नवख्या गो
औकिब नबी दुलेप ट्रॉफी रेकॉर्ड: दिलीप ट्रॉफीमध्ये सध्या भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. यंदा तर असा पराक्रम घडला आहे, जो याआधी कधीही झालेला नव्हता. नॉर्थ झोनकडून खेळणाऱ्या औकिब नबीने फक्त चार चेंडूंमध्ये चार गडी बाद करत इतिहास रचला आहे. दिलीप ट्रॉफीमध्ये याआधी कोणीही असा पराक्रम केलेला नव्हता. नबीने एकूण पाच विकेट्स घेतल्या आहेत.
जम्मू-काश्मीरचा औकिब नबी
औकिब नबी हा जम्मू-काश्मीरचा खेळाडू असून तो दिलीप ट्रॉफीत नॉर्थ झोनकडून खेळत आहे. ईस्ट झोनविरुद्ध त्याने भेदक आणि जबरदस्त गोलंदाजी केली. भारतातील पहिल्या श्रेणीच्या क्रिकेटमध्ये याआधी तिघा खेळाडूंनी चार चेंडूंमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत, पण ते रणजी ट्रॉफीत घडले. दिलीप ट्रॉफीत असा पराक्रम करणारा नबी हा पहिला खेळाडू ठरला आहे.
घड्याळ: ऑकीब नबीच्या 6 विकेट्स वि सेवांमध्ये #रांजिट्रोफी? आतापर्यंत रांजीच्या 3 सामन्यांत त्याच्या नावावर आधीपासूनच दोन फिफर्स आहेत आणि ते जम्मू-काश्मीरचे स्वरूपात अव्वल अष्टपैलू आहेत. तो फक्त ग्रीन टॉपवर परंतु सपाट डेकवरही विकेट घेत नाही. बारीक लोअर-ऑर्डर पिठातही pic.twitter.com/oaxjtoic3n
– मोहसिन कमल (@64 मोहसिंकॅमल) ऑक्टोबर 29, 2024
1988 मध्ये प्रथमच झाला पराक्रम
रणजी ट्रॉफीत पहिल्यांदा 1988 मध्ये दिल्लीच्या शंकर सैनीने चार चेंडूंमध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 2018 मध्ये जम्मू-काश्मीरच्या मोहम्मद मुधासिरने राजस्थानविरुद्ध हा पराक्रम केला. मग 2024 मध्ये मध्य प्रदेशच्या कुलवंत खेजरोलियाने बडोद्याविरुद्ध हेच यश मिळवले. आणि आता औकिब नबीने नॉर्थ झोनकडून ईस्ट झोनविरुद्ध हा पराक्रम केला आहे. मात्र त्याचे वैशिष्ट्य असे की, हे रणजीमध्ये नव्हे तर दिलीप ट्रॉफीत झाले आहे.
नबीची कारकीर्द
औकिब नबीचा जन्म 4 नोव्हेंबर 1996 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्याने आत्तापर्यंत 29 प्रथम श्रेणी सामने खेळून 90 बळी घेतले आहेत. यात 4 वेळा चार विकेट्स आणि 8 वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 29 सामन्यांतून त्याने 42 बळी घेतले, तर टी-20 मध्ये 27 सामन्यांतून 28 विकेट्स घेतल्या आहेत.
औकिब नबी अचानक आला चर्चेत
औकिब नबीबद्दल याआधी फारसे लोकांना माहिती नव्हती. पण दिलीप ट्रॉफीतल्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे तो अचानक चर्चेत आला आहे. या सामन्यात त्याने 10.1 षटकांत केवळ 28 धावा दिल्या आणि 5 महत्वाचे बळी घेतले.
हे ही वाचा –
साराच्या मागे उभी, आजीसासूचा वाढदिवस केला खास; लग्नाआधीच सूनबाई घरात, सचिन म्हणाता तू खंबीर म्हणून…
आणखी वाचा
Comments are closed.