प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी त्या चालकाची रिक्षा जप्त, मारहाणीचे खरे कारण आले समोर

मुंबईत एका रिक्षाचालकाने एका प्रवाशाला जोरदार मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या रिक्षावाल्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला होता. या चालकाची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पण या घटनेत एक ट्विस्ट आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण सांताक्रूझ ते अंधेरी स्टेशनपर्यंत या रिक्षाने आला होता. आणि त्याचं भाडं 140 रुपये झालं होतं. पण तो तरुण नशेत होता आणि त्याने पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे रिक्षाचालक चिडला आणि त्याने प्रवाशाला मारहाण केली.

या व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अंधेरी वाहतूक शाखेने कारवाई करत रिक्षा जप्त केली आणि चालकाला नोटीस बजावली. प्रवाशावर हल्ला केल्याबद्दल त्याचा परवाना रद्द का करू नये आणि परमिट निलंबित का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. ही गंभीर गैरवर्तणूक आणि हिंसाचाराची घटना आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी चालकाचा शोध घेतला आणि चौकशीसाठी त्याला पाचारण केले. मात्र, अद्याप पीडित किंवा त्याच्या कुटुंबाकडून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.