मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड, किवींचा सपेशल पराभव

बुधवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सहा विकेट्सने पराभव केला. माउंट मौंगानुई येथे प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत सहा विकेट्स गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 16.3 षटकांत चार विकेट्सच्या बदल्यात 185 धावा केल्या आणि सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक 85 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शने 182 धावांच्या पाठलागात ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. ट्रॅव्हिस हेडने 18 चेंडूत 31 धावा केल्या. हेड आणि मार्शने 67 धावांची सलामी भागीदारी केली. मॅथ्यू शॉर्ट 18 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. कर्णधार मिचेल मार्शने 43 चेंडूत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह 85 धावा केल्या. अ‍ॅलेक्स कॅरीने सात चेंडूत सात धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्रीने दोन विकेट घेतल्या, तर फोल्क्स आणि जेमिसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 20 षटकांत सहा विकेट गमावून 181 धावा केल्या. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. टिम सेफर्टला तीन चेंडूत फक्त चार धावा करता आल्या. डेव्हॉन कॉनवेने दोन चेंडूत एक धाव केली. मार्क चॅपमन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. डॅरिल मिशेल 23 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ड्वारिसने दोन, हेझलवूड आणि शॉर्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments are closed.