Aus w vs Ind w – ताळमेळ सुटला अन् विकेट गेली! प्रतिका बेभान धावली, पण हरमनप्रीत जागची नाही हलली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

होबार्टच्या बेलेराइव्ह ओव्हल मैदानावर हिंदुस्थानच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाशी सामना रंगत आहे. महिला वर्ल्डकप स्पर्धेत पायाला झालेल्या दुखापतीतून सावरलेली प्रतिका रावल हिने जबरदस्त कमबॅक करत अर्धशतक ठोकले. मात्र अर्धशतकानंतर हरमनप्रीतसोबत ताळमेळावा अभाव झाल्याने ती धावबाद झाली. बाद होण्यापूर्वी प्रतिकाने 52 धावा केल्या.

दुखापतीतून कमबॅक करणारी प्रतिका रावल ही पहिल्या लढतीत शून्यावर बाद झाली होती. त्यामुळे दुसऱ्या लढतीत तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आणि या अपेक्षांवर ती खरी ठरली. तिने 81 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या खेळीसह तिने खास विक्रम आपल्या नावे केला. अवघ्या 25 डावात 10 व्यांदा अर्धशतकाहून अधिक धावा तिने चोपल्या.

चोरटी धाव घेताना बाद

हिंदुस्थानच्या डावातील 23 व्या षटकात एक चोरटी धाव घेताना प्रतिका बाद झाली. अलाना किंग हिच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्रतिकाने मिडऑनला शॉट खेळला. चेंडू थेट फिल्डरच्या हातामध्ये गेला. मात्र हरमनप्रीत कौरकडे लक्ष न देता प्रतिका बेभान धावली. परंतु हरमनप्रीतने तिला माघारी धाडले, तोपर्यंत उशीर झाला. अॅनाबेल सदरलँड हिने चेंडूत यष्टीरक्षक मूनीकडे फेकला आणि मूनीने यष्ट्या उडवत प्रतिकाला बाद केले.

Comments are closed.