आम्ही राजकारणी नाही, शेतकरी आहोत! म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं चूक आहे का? मुख्यमंत्र्यांना खरमरीत सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 24 सप्टेंबरला औसा तालुक्यातील उजनी येथील पूरगस्तभागाची पाहाणी करायला आले होते. त्यावेळी पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र मुख्यमंत्री बोलत असताना त्यावेळी ‘कर्जमाफी द्या’ अशी मागणी करणाऱ्या एका शेतकऱ्याला मध्येच थांबवत “ऐ दादा गप्प बस, राजकारण करू नकोस!” अशा शब्दात ओरडले.

मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे दुखावलेल्या त्या शेतकऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच तुम्हाला निवडून दिलं ही आमची चूक झाली का? असा सवाल देखील त्या शेतकऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

मी मुख्यमंत्र्यांना फक्त तुम्ही किती नुकसान भरपाई देणार हे जाहीर करा. असं सांगितलं होतं. पण जेव्हा मी ते मुख्यमंत्र्यांना म्हणालो तेव्हा ते म्हणाले की तू राजकारण करू नका. मला त्यांना सांगायचे आहे की मी राजकारणी नाही. मी सामान्य शेतकरी आहे. शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं चूक आहे का? तुम्हाला निवडून दिलं ही आमची चूक झाली का? असा संतप्त सवाल शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Comments are closed.