औसा नगरपरिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ताबा; 23 पैकी 17 जागेवर विजय, काँग्रेसचा पराभव

Ausa Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 : लातूर जिल्ह्यातील औसा नगरपरिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील औसा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीद्वारे ताबा मिळवला आहे. यात 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाद्वारे दणदणीत विजय मिळवला आहे. तर 6 जागेवर भाजपद्वारे विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे.

औसा नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचा निकाल : काँग्रेस निवडणुकीत भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र

महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी (Nagarpanchyat Election 2026) मतमोजणी होईल. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच औसा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीद्वारे ताबा मिळवत्यामुळे तब्बल 23 जागे पैकी 17 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर 6 जागेवर भाजपद्वारे विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे. गेल्या वेळेस दोन वरून यावर काँग्रेस चक्क शून्यावर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसला औसामध्ये मोठा धक्का बसला आहे. विशिष्ट म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजया झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.