183-3 वरून 236 धावांवर कांगारू संघ गारद; राणाच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले


IND vs AUS 3रा ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 236 धावा केल्या. सिडनीत खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सुरुवातीनंतर मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची खेळी डळमळली, मात्र मॅट रेनशॉने अर्धशतक झळकावत डाव सावरला. पण 50 षटके पूर्ण खेळण्याआधीच कांगारू संघ 236 धावांवर गारद झाला.

पहिल्या 10 षटकांत ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सुरुवात

नाणेफेक जिंकून फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच भारतीय गोलंदाजांवर चांगलाच पार केला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने फक्त 9.2 षटकांत 61 धावांची भागीदारी करत जोरदार सुरूवात दिली. मोहम्मद सिराजने हेडला झेलबाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. हेडने 25 चेंडूत 29 धावा केल्या. त्यानंतर लवकरच मिचेल मार्शही 41 धावा करून बाद झाले.

मॅट रेनशॉने ठोकले अर्धशतक

मॅथ्यू शॉर्ट आणि मॅट रेनशॉ या जोडीने मधल्या षटकांमध्ये डाव सावरला. उजव्या-डाव्या हाताच्या या जोडीने भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. दोघांमध्ये 36 धावांची भागीदारी झाली. 23व्या षटकात शॉर्ट (30) बाद झाला. मात्र रेनशॉ 34व्या षटकापर्यंत क्रीजवर ठाम उभा राहिला आणि 58 चेंडूत 56 धावांची महत्त्वाची खेळी साकारली. या दरम्यान त्याने दोन चौकार लगावले. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या रेनशॉचे हे पहिलेच वनडे अर्धशतक ठरले.

183-3 वरून 236 धावांवर कांगारू संघ गारद

183 धावांवर अलेक्स कॅरी (24) बाद झाल्यानंतर पुढच्या केवळ 18 धावांच्या आत ऑस्ट्रेलियाने आणखी 4 विकेट गमावल्या. त्यामुळे 300 धावांचा टप्पा गाठण्याची शक्यता असताना त्याचा डाव 236 धावांवर आटोपला. भारताकडून हर्षित राणाने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

हे ही वाचा –

Shreyas Iyer Injury Video : मागे पळत सूर मारुन झेल पकडला, पण श्रेयस अय्यर जोरात आपटला, रडत रडत सोडलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.