स्वत: तर घाण केलीच टीम इंडियाचंही वाट्टोळं केलं, पाकिस्तानची पराभवाची हॅटट्रिक, पॉईंट टेबलमध्ये


महिलांचे विश्वचषक गुण सारणी 2025 अद्यतनः आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 मधील नवव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान (Australia beat Pakistan) संघाचा 107 धावांनी धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या (Beth Mooney) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 222 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला हे आव्हानही पेलता आलं नाही आणि प्रत्युत्तर संपूर्ण संघ केवळ 114 धावांत गारद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने 109 धावांची ऐतिहासिक खेळी साकारत चमकदार कामगिरी केली. पाकिस्तानसाठी हा सलग तिसरा पराभव ठरला, तर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला.

स्वत: तर घाण केलीच टीम इंडियाचंही वाट्टोळं केलं…

दरम्यान, पाकिस्तानच्या पराभवानंतर आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये (Women’s World Cup Points Table 2025 Update) ते शेवटच्या स्थानी आहे, तर भारताला (Team India) मोठा धक्का बसला आहे. मंगळवार, 6 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत भारतीय संघ अव्वल स्थानावर होता, मात्र बुधवारी रात्रीपर्यंत संघ तिसऱ्या स्थानावर घसरला. 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे त्यांनी अव्वल स्थान मिळवले आहे, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर गेला आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 5 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडकडे 4 गुण असून नेट रनरेट चांगला असल्याने त्या दुसऱ्या स्थानावर आहेत. भारताकडेही 4 गुण आहेत, पण रनरेटच्या फरकामुळे संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश 2 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. खालच्या चार स्थानांवर मात्र विशेष बदल झालेला नाही. पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट झाली आहे, कारण संघ आधीच शेवटच्या पायरीवर आहे.

पाकिस्तानची पराभवाची हॅटट्रिक

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या या विश्वचषकात पाकिस्तान हा सलग तीन सामने हरलेला पहिला संघ ठरला आहे. अजूनपर्यंत पाकिस्तानचे खातेही उघडलेले नाही. लीग टप्प्यात एकूण सात सामने खेळायचे असून त्यापैकी तीन सामने आधीच गमावले गेले आहेत. त्यामुळे संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांनंतर 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका एका पराभवासह आणि एका पावसात रद्द झालेल्या सामन्यामुळे 1 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने दोन सामने गमावले असून पाकिस्तान तीन पराभवांसह सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत.

हे ही वाचा –

Sanju Samson : … तर नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी तयार, डाव्या हातानं गोलंदाजी देखील करेन, संजू सॅमसनचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठं वक्तव्य

आणखी वाचा

Comments are closed.