चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा, कांगारू संघाचा लज्जास्पद रेकॉर्ड!
चॅम्पियन्स ट्रॉफीचा (ICC Champions Trophy 2025) सध्याचा हंगाम आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. यासोबतच यंदाची ही मेगा स्पर्धा अधिकच रंगतदार होत चालली आहे. या मेगा स्पर्धेतील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व क्रिकेट सामन्यांचा क्रिकेटप्रेमी पुरेपूर आनंद घेत असतील. तत्पूर्वी यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील अनेक जुने रेकाॅर्ड मोडले गेले. त्याच वेळी, काही खेळाडू आणि संघांच्या नावावर नको असलेले रेकॉर्ड देखील नोंदवले गेले.
या स्पर्धेतील 10व्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर असाच एक लाजिरवाणा रेकाॅर्ड नोंदवण्यात आला आहे.
खरेतर, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 37 अतिरिक्त धावा दिल्या. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा देणारा तिसरा संघ ठरला आहे. या बातमीद्वारे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा देणाऱ्या 3 संघांबद्दल जाणून घेऊया.
1) भारत- 42 धावा विरुद्ध केनिया (2004)- चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा देण्याचा लज्जास्पद रेकाॅर्ड भारताच्या नावावर आहे. केनियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 42 अतिरिक्त धावा दिल्या होत्या. पण असे असूनही, भारतीय संघाने हा सामना 98 धावांनी जिंकला होता. भारताकडून या विजयाचा नायक सौरव गांगुली (Sourav Ganguly) होता. यादरम्यान त्याने 90 धावांची शानदार खेळी केली होती.
2) नेदरलँड्स- 38 धावा विरुद्ध श्रीलंका (2002)- 2002च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेदरलँड्सचा संघही जेतेपद जिंकण्याच्या शर्यतीत होता. पण स्पर्धेत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नेदरलँड्सने 38 अतिरिक्त धावा दिल्या होत्या.
3) ऑस्ट्रेलिया- 37 धावा विरुद्ध अफगाणिस्तान (2025)- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. दरम्यान संघाची धावसंख्या सर्वबाद 273 झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना 37 अतिरिक्त धावा दिल्या. यामध्ये 5 धावा बाय द्वारे, 15 धावा लेग बाय द्वारे आणि 17 धावा वाईड द्वारे आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार संधी?
“बाबर आझमचा बाप विराट कोहली!’- लाहोरच्या मुलाच्या उत्तराने सोशल मीडियावर खळबळ”
पाकिस्तान-बांग्लादेशचं वर्चस्व संपलं? आता आशियातील भारतानंतर सर्वश्रेष्ठ टीम कोणती?
Comments are closed.