ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने कसोटीचा सन्मान राखायलाच हवा – चॅपल

ज्या कसोटी क्रिकेटने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला ओळख दिली, त्या फॉर्मेटचा सन्मान दोन्ही संघांनी राखायलाच हवा. जेव्हा अॅशेस कसोटी दोन दिवसांत संपते तेव्हा कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आल्याची भीती दाटून येते, अशी अस्वस्थता माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि दिग्गज ग्रेग चॅपल यांनी शब्दांत मांडली

एमसीजीवर हा सामना दुसऱया दिवशी तिसऱया सत्रातच निकालात निघाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर दिलेलं 178 धावांचं लक्ष्य बेन स्टोक्सच्या संघाने सहा विकेट्स गमावत पूर्ण केले. स्कोअरबोर्डवर विक्रमी विजय नोंदला गेला, पण कसोटी क्रिकेटच्या आत्म्यावर खोल ओरखडा बसला, असे चॅपल यांनीआपल्या लेखात लिहिलेय.

त्यांनी आपल्या लेखात ‘मॉन्युमेंट्स मेन’चा दाखला दिला आहे. दुसऱया महायुद्धात ज्या स्त्राr-पुरुषांनी बॉम्बवर्षावाच्या धोक्यात उभं राहून जगातील अमूल्य कला आणि वारसा वाचवला, त्यांची आठवण करून देत अॅशेसलाही तसंच जतन आणि आदर मिळायला हवा, अशा भावना ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केल्या आहेत.

1877 साली सुरू झालेली हे ऐतिहासिक वैर आता 150 वर्षांच्या उंबरठय़ावर पोहोचले आहे. अशा वेळी बॉक्सिंग डे कसोटी दोन दिवसांत संपते, तेव्हा या पवित्र वारशाचं भवितव्य धोक्यात आहे की काय, अशी भीती त्यांच्या शब्दांतून व्यक्त होते. जो सामना कसोटी क्रिकेटच्या वैभवाचं प्रतीक ठरायला हवा होता, तो केवळ एक क्षणिक तमाशा बनून राहिला, अशीही खंतही त्यांनी मांडली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन परंपरावादी संघांनी आपल्या चाहत्यांना फक्त दोन दिवसांचा खेळ दिला आणि तेही अपुरं समाधान देणारा होता. या कामगिरीमुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

Comments are closed.