ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना अनिर्णित! ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये एँट्री

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) दहावा सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान (Australia vs Afghanistan) संघात खेळला गेला. दरम्यान हा सामना पावसाने खोळंबा घातल्या कारणाने अनिर्णित राहिला. यासह, ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये एँट्री केली आहे.

हा सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेलाही फायदा झाला आहे, कारण त्यांचे सेमीफायनलचे तिकीट जवळपास निश्चित झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 273 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण 13 षटकेही खेळू शकला नाही. 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 12-5 षटकांत 1 गडी बाद 109 धावा केल्या असताना 9सामन्यात पाऊस पडला. दरम्यान विस्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) 58 धावा केल्या आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) 19 धावा केल्या.

बातमी अपडेट होत आहे….

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा, कांगारू संघाचा लज्जास्पद रेकॉर्ड!
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार संधी?
जॉस बटलरचा धक्कादायक निर्णय – इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा!

Comments are closed.