चॅम्पियन्स ट्राॅफी दरम्यान संघाला मोठा धक्का…! स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

सध्या सुरू असलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्राफी (ICC Champions Trophy 2025) अंतिम टप्प्याकडे चालली आहे. दरम्यान (28 फेब्रुवारी) रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान (Australia vs Afghanistan) संघात सामना खेळला गेला. पावसानं खोळंबा घातल्या कारणाने हा सामना अनिर्णित राहिला. दरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे कारण  सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) भारत किंवा न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यातून बाहेर पडू शकतो.

पावसामुळे रद्द झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात शॉर्टने 15 चेंडूत 20 धावा केल्या. यादरम्यान त्याला अझमतुल्ला उमरझाईने (Azmatullah Omarzai) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसला सांगितले की, “मला वाटते की शाॅर्ट पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आम्हाला दिसले की तो नीट हालचाल करू शकत नव्हता. पुढच्या सामन्यात त्याला सावरणे कठीण होईल.”

ऑस्ट्रेलिया संघ 16 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनल सामना 4 किंवा 5 मार्च रोजी होईल. हे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. तत्पूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या अलिकडच्या 2 वनडे सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला आक्रमक फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) ऑस्ट्रेलियाकडून खेळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Champions Trophy 2025: रोहित शर्माचा पत्ता कट? शुबमन गील टीम इंडियाचा कर्णधार!
किंग कोहली पुन्हा इतिहास रचणार? न्यूझीलंडविरुद्ध मोडू शकतो हे 3 महान विक्रम!
ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित!

Comments are closed.