17 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक घसरगुंडी! विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत आतापर्यंत किती वेळा पत्करावा लागला पराभव?

ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वचषकातील प्रवास पहिल्याच फेरीत संपला आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती की बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ इतकी सुमार कामगिरी करेल. दुसरीकडे, झिम्बाब्वेने सर्वांना धक्का देत पुढच्या फेरीचे (सुपर 8) तिकीट मिळवले आहे. तब्बल 17 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.

2009 नंतर पहिल्यांदाच 2007 पासून सुरू झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया केवळ दुसऱ्यांदा पहिल्या फेरीत बाहेर पडली आहे. यापूर्वी 2009 मध्ये असे घडले होते, त्यानंतर आता थेट 2026 मध्ये (17 वर्षांनी) ही वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत फक्त एकदाच (2021 मध्ये) न्यूझीलंडला हरवून टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.

वनडे विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया फक्त 3 वेळा पहिल्या फेरीत बाहेर पडली आहे.

1979 मध्ये
1983 मध्ये
1992 मध्ये

म्हणजेच, दोन्ही प्रकारचे विश्वचषक मिळून ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकूण 5 वेळा पहिल्या फेरीत बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती, पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली.
11 फेब्रुवारी (वि. आयर्लंड): 67 धावांनी विजय मिळवला.
13 फेब्रुवारी (वि. झिम्बाब्वे): झिम्बाब्वेने ऐतिहासिक खेळ करत ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवले.
16 फेब्रुवारी (वि. श्रीलंका): श्रीलंकेने 8 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला.

ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना ओमान विरुद्ध आहे, जो आता केवळ एक औपचारिकता उरली आहे. हा सामना खेळून ऑस्ट्रेलियन संघ रिकाम्या हाताने मायदेशी परतणार आहे.

Comments are closed.