ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ सुरूच..! पाकिस्तानच्या रेकाॅर्डची केली बरोबरी, आता भारताचा 'हा' मोठा रेकाॅर्ड धोक्यात

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका: ऑस्ट्रेलिया संघाने मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 धावांनी जिंकला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डार्विनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 178 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 20 षटकात 161 धावांपर्यंतच पोहोचू शकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपलाच एक जुना रेकाॅर्ड मोडला असून, पाकिस्तानच्या मोठ्या रेकाॅर्डची बरोबरी केली आहे. (Pakistan T20 record)

मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाने गेल्या काही काळापासून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सलग 9 वा विजय नोंदवला आहे. (Australia consecutive T20 wins) ऑस्ट्रेलियाने त्यांचा स्वतःचा सलग 8 विजयांचा जुना रेकाॅर्ड मोडला असून, पाकिस्तानच्या रेकाॅर्डची बरोबरी केली आहे. आता जर त्यांनी पुढील 4 टी20 सामने जिंकले, तर ते भारताचा रेकाॅर्डही मोडू शकतील. भारतीय संघाने नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते.

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा रेकाॅर्ड युगांडा संघाच्या नावावर आहे आणि हा रेकाॅर्ड अजूनही कायम आहे. युगांडाने त्यांचे मागील 17 टी20 सामने जिंकले आहेत. या यादीत 15 सलग विजयांसह स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपान 14 सलग विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर 13-13 विजयांसह मलेशिया आणि बर्मुडा संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत. भारत, अफगाणिस्तान, रोमानिया आणि यूएई 12-12 सलग विजयांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. (T20 international records)

Comments are closed.