सॅम कॉन्स्टासचे पदार्पणात झंझावाती अर्धशतक, ऑस्ट्रेलियाने नोंदवला विक्रम; भारताची अवस्था बिकट
यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो पहिल्या सत्रात पूर्णपणे योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात करण्याचे श्रेय 19 वर्षीय नवोदित सॅम कॉन्स्टासला जाते. त्याने स्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावताना भारतीय गोलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 25 षटकांत 1 बाद 112 धावा केल्या होत्या. क्रीजवर उस्मान ख्वाजा 38 आणि मार्नस लॅबुशेन 12 धावांसह खेळत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला डाव खेळणाऱ्या सॅम कॉन्स्टासने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्याचा विचार केला होता आणि त्याला जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांची भीती नव्हती. त्याने सुरुवातीपासूनच शॉट्स खेळायला सुरुवात केली. यादरम्यान बुमराहने एका ओव्हरमध्ये तीन स्कूप शॉट्स खेळून सर्वांना रोमांचित केले. कॉन्स्टासने कोणत्याही गोलंदाजाला सोडले नाही आणि यादरम्यान तो बुमराहविरुद्ध अधिक आक्रमक दिसत होता. त्याने अवघ्या 52 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
एकीकडे सॅम कॉन्स्टास तुफानी शैलीत फलंदाजी करत होता. तर दुसरीकडे त्याचा साथीदार उस्मान ख्वाजा सावध फलंदाजी केली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या विकेटसाठी 19.2 षटकांत 89 धावांची सुरुवात करून दिली. यानंतर कॉन्स्टासची विकेट पडली, त्याला रवींद्र जडेजाने एलबीडब्ल्यू आऊट केले. बाद होण्यापूर्वी कॉन्स्टासने 65 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली, ज्यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
यानंतर मार्नस लॅबुशेन ख्वाजाला साथ देण्यासाठी आला आणि या दोघांनीही सत्र संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला कोणताही धक्का बसू दिला नाही. ऑस्ट्रेलियाने 25 षटकांत 1 विकेट गमावून 112 धावा करून एक विशेष विक्रमही आपल्या नावावर केला. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कोणत्याही संघाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
हेही वाचा-
IND vs AUS: मेलबर्नमध्ये वातावरण तापलं, 19 वर्षीय खेळाडूची कोहली सोबत धक्काबुक्की, पाहा VIDEO
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये किती वेळा भिडले भारत-पाकिस्तान? कोणाचं पारडं जड?
कोहली, रोहित, पंत नाही, तर हा खेळाडू भारतासाठी ‘वन मॅन आर्मी’ रवी शास्त्रींचे मोठे वक्तव्य
Comments are closed.