3 वेगवान गोलंदाज, 2 फिरकीपटू तर…. पहिल्या वनडेमध्ये ही असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, पहिला वनडे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात नितीश कुमार रेड्डीला संधी देण्यात आली असून तो आपला पहिला वनडे सामना खेळत आहे. याशिवाय, रोहित शर्मा आणि विराट कोहलीही बर्याच काळानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात उतरले आहेत.
भारतीय कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीदरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिलला विचारण्यात आले की जर त्याने नाणेफेक जिंकली असती तर तो काय केला असता? गिलने उत्तर दिले की तो देखील प्रथम गोलंदाजी करायला प्राधान्य देईल.
एक दिवस तो कधीही विसरणार नाही! ✨
नवोदित नितीश कुमार रेड्डी यांच्यासाठी हा खास क्षण आहे, ज्यांना रोहित शर्माकडून एकदिवसीय कॅप मिळाली आहे 🧢 🇮🇳
अपडेट्स ▶ https://t.co/O1RsjJTHhM#TeamIndia | #AUSWIN | @NKReddy07 pic.twitter.com/ZpJUaiQqC5
— BCCI (@BCCI) 19 ऑक्टोबर 2025
भारत-ऑस्ट्रेलिया संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घ्या
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यशत्रिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टिरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
मिचेल मार्शने नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
नितीश रेड्डी यांचे वनडे पदार्पण 🧢#AUSWIN 👉 पहिली वनडे | आता थेट 👉 https://t.co/FkZ5L4CrRl pic.twitter.com/sc4BZzos5W
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 19 ऑक्टोबर 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आकडेवारी
एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आजवर एकूण 152 वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 84 सामने ऑस्ट्रेलियाने तर 58 सामने भारताने जिंकले आहेत. भारतामध्ये झालेल्या 72 सामन्यांपैकी 34 सामने ऑस्ट्रेलियाने आणि 33 सामने भारताने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियात झालेल्या 54 सामन्यांपैकी 38 सामने कांगारूंनी आणि 14 सामने भारताने जिंकले आहेत. तटस्थ स्थळी झालेल्या 26 सामन्यांपैकी 11 भारताने आणि 12 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. असा हा दोन्ही संघांचा ऐतिहासिक द्वंद्व पुन्हा एकदा रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.