किंग कोहलीशी मैदानात वाद घालणाऱ्या सॅम कॉन्स्टासला मिळाली संधी! WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

2025 डब्ल्यूटीसी फायनलसाठी ऑस्ट्रेलिया पथक: पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा विजेतेपदाचा सामना 11 जूनपासून खेळला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी  15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मिचेल मार्शला स्थान मिळालेले नाही. पण बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान विराट कोहलीशी वादग्रस्त ठरलेला युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टास याला संघात स्थान मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक असेल. जर यावेळीही ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली, तर कांगारू संघ दोनदा वर्ल्ड जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकणारा पहिला संघ बनेल, कारण 2023 मध्येही याच संघाने भारताला हरवून जेतेपद जिंकले होते. त्याच वेळी, 2021 मध्ये, न्यूझीलंड संघ या स्पर्धेचा विजेता बनला.

ऑस्ट्रेलियन निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी ‘cricket.com.au’ ला सांगितले की, “श्रीलंकेला मालिकेत हरवून संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद सायकलचा शेवट चांगला केला. यापूर्वी, भारताला एका दशकात प्रथमच कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. गेल्या दोन वर्षांत संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि आता आमच्याकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेतेपद राखण्याची संधी आहे.”

ऑस्ट्रेलियाच्या संघात 6 महिन्यांनंतर स्टार अष्टपैलू खेळाडू परतला आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पूर्ण तंदुरुस्तीत परतल्यानंतर कॅमेरॉन ग्रीन संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासलाही संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकने सुद्धा आपला संघ जाहीर केला.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ (Australia Squad WTC Final 2025)

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुनहेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Squad WTC Final 2025)

टेम्बा बावुमा (कर्नाधर), ईडन मार्कराम, लुंगी अँजिडी, टोनी डी जॉर्जि, डेव्हिड बेडिंघम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टॅब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरान मुथुसामी, मार्को जॉन्सन, कागिसो रबडा, काइल वेहरान, डेन पॅटर्स.

अधिक पाहा..

Comments are closed.