कमालच! 92 व्या वर्षी डॉक्टर झाला पिता, 37 वर्षीय पत्नीनं दिला गोंडस बाळाला जन्म; मोठा मुलगा 65 वर्षांचा

ऑस्ट्रेलियात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. जिथे एक 92 वर्षीय डॉक्टर बाबा झाले आहेत. त्यांच्या 37 वर्षाच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हे जोडपं सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. .

ऑस्ट्रेलियातील डॉक्टर जॉन लेविन यांची पत्नी डॉ.यानयिंग लु यांना एक मुलगा झाला आहे. त्याचे नाव त्यांनी गॅबी ठेवले आहे. गॅबी याचा जन्म डॉक्टरांच्या 65 वर्षांच्या मुलगा ग्रेग याच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी झाला आहे. ग्रेग यांचा मृत्यू मोटर न्यूरॉन डिसीजने झाला होता. डॉ. लेविन जनरल प्रॅक्टिशनर आहेत. ते अॅण्टी एजिंग विशेषतज्ज्ञ आहेत.

ऑस्ट्रेलियन मिडीयाच्या वृत्त्तानुसार, लेविन यांची पहिली पत्नी यांचा 57 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर त्यांना एकटेपणा आला होता. त्यानंतर त्यांनी नवीन भाषा मंदारिन शिकण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान त्याची भेट डॉक्टर यानयिंग लु से यांच्याशी झाली. त्या मुळच्या चिनी आहेत. भाषा शिकता शिकता दोघांमध्ये प्रेम झाले त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी तिच्याशी लग्न केले.आयवीएफ डोनर स्पर्मच्या माध्यमातून यानयिंग पहिल्याच प्रयत्नात गर्भवती राहिल्या. त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती त्यांनी आता दिली.

डॉ.लेविन यांच्या म्हणण्यानुसार 92 व्या वर्षी जेव्हा त्यांच्या हातात त्यांचा मुलगा आला त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

Comments are closed.