अवंतिका देसाईचे रुपेरी यश, राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी; प्रबोधन गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अवंतिका देसाईने चमकदार कामगिरी केली असून प्रबोधन गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माजी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्थापन केलेल्या प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱया ओझोन स्विमिंग पूल अॅपॅडेमीची खेळाडू अवंतिका देसाईने बंगळुरू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 बाय 50 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या इतिहासात हे प्रथमच घडल्याने संस्थेला राष्ट्रीय जलतरण स्पर्धेच्या विश्वात मानाचे आणि अभिमानास्पद स्थान प्राप्त झाले. अवंतिका देसाई ही माजी आमदार नीला देसाई यांची नात आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अमित देसाई यांची कन्या आहे.
हे स्थान प्राप्त करण्यासाठी अवंतिकाची प्रचंड मेहनत, ऑलिम्पिक खेळाडू आणि प्रशिक्षक रॉन डिसोझा यांचे उत्पृष्ट प्रशिक्षण आणि अमिश पतीपत्नीने तिच्यासाठी दिवसरात्र केलेले प्रयत्न यांचा मोलाचा वाटा आहे. अवंतिकाच्या या कामगिरीसाठी प्रबोधन गोरेगाव संस्थेसह समस्त गोरेगावकरांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Comments are closed.