जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला

IND vs ENG T20 विश्वचषक 2026 उपांत्य फेरी : टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. संजू सॅमसनची 89 धावांची तुफानी खेळी आणि अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे सामना भारताच्या बाजूने फिरला. मात्र या सर्वांबरोबरच इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा ‘बापू’ अक्षर पटेल मैदानावर हिरो ठरला.

या सामन्यात अक्षर पटेलने केलेल्या करिश्माई फिल्डिंगने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची मने जिंकली. विल जॅक्सचा घेतलेला त्यांचा अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा कॅच इतका थरारक होता की भारतीय खेळाडूंमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला. इतकेच नव्हे तर डगआउटमध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही हा क्षण पाहून खुर्चीतून उडी मारून आनंद व्यक्त करताना दिसले.

विल जॅक्सचा कॅच पकडण्यासाठी अक्षर पटेलने जवळपास 20 ते 30 मीटरपर्यंत वेगाने धाव घेतली. चेंडू पकडताना तो बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ पोहोचला. मात्र चपळाई दाखवत त्यांनी योग्य वेळी चेंडू शिवम दुबेकडे हवेत फेकला.  या कॅचनंतर स्टेडियममधील चाहत्यांनी जल्लोष केला. या सामन्यात अक्षर पटेलने एकूण दोन कॅच घेतले आणि एक विकेटही मिळवली. त्याने तीन षटके टाकत 25 धावा देत 1 विकेट घेतली. मात्र विल जॅक्सचा घेतलेला तो कॅचच सामन्याचा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला.

गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला… (Gautam Gambhir Reaction)

नेहमी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही या अप्रतिम फिल्डिंगनंतर आपला आनंद आवरता आला नाही. शिवम दुबेने झेल पूर्ण करताच गंभीर खुर्चीवरून उठला आणि पळत सुटला. गंभीरचा हा भन्नाट सेलिब्रेशनचा क्षण आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

टीम इंडियाची इतिहासात नोंद…

या शानदार विजयासह भारताने टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (4 वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ बनण्याचा मान पटकावला आहे. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून, चाहत्यांना एका थरारक लढतीची उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा –

IND vs NZ Final T20 World Cup : अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती OUT, रिंकू, कुलदीप IN…. टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11

आणखी वाचा

Comments are closed.